बातम्या

नवी मुंबईतील उड्डाणपूल उजळणार

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : रस्त्यांवरील मुख्य चौक, पदपथ, उड्डाणपूल आदी रहदारीची ठिकाणे हायमास्टच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघणार आहेत. बेलापूर ते वाशी आणि तुर्भे ते दिघा अशा दोन्ही विभागात तब्बल २०१ हायमास्ट लावण्यास महापालिकेने हिरवा कंदील दिला आहे. हे हायमास्ट बसवण्यासाठी पालिकेतर्फे सुमारे १५ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.   

परिमंडळ एक व परिमंडळ दोनमधील महत्त्वाच्या ठिकाणी काळोखाचे साम्राज्य असल्याने अनुचित घटना घडण्याची भीती नागरिक व लोकप्रतिनिधींकडून वर्तवण्यात येत होती. त्यानुसार प्रशासनातर्फे बेलापूर ते वाशी या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षण केले असता मुख्य चौकामध्ये प्रखर प्रकाशव्यवस्थेची आवश्‍यकता असल्याचे लक्षात आले. तसेच लख्ख प्रकाश असेल तर चौकातून दळणवळणाकरिता नागरीकांना सुविधा होईल, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले. शहरातील उड्डाणपुलांवरील वाहनांच्या कंपनामुळेही उड्डाणपुलांवर बसवलेल्या दिव्यांच्या वाहिन्या सैल होऊन दिवे बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनातर्फे तुर्भे ते दिघादरम्यान ७३ व बेलापूर ते वाशी दरम्यान १२८ असे एकूण २०१ हायमास्ट लावण्यात येणार आहेत. 

या ठिकाणी लावले जाणार हायमास्ट
सीबीडीतील आयकर कॉलनी, बेलापूर सेक्‍टर- ११, नेरूळ सेक्‍टर- १९, वंडर्स पार्कजवळ, एकता सोसायटीजवळ, राजीव गांधी स्टेडियम, अरेंजा कॉर्नर, भारती विद्यापीठ, आग्रोळी गाव, चिंतामणी चौक, सीबीडी विपश्‍यना केंद्र, पारसिक हिल, गावदेवी मंदिर, दिवाळे समाजमंदिर, सानपाडा उड्डाणपूल, नेरूळ एल ॲण्ड टी उड्डाणपूल आदी १२८ ठिकाणी ९ कोटी ६५ लाख रुपये खर्च करून हायमास्ट बसवले जाणार आहेत.

Web Title: Navi Mumbai Chowk, flyover will be light

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Nirupam : त्यावेळी माझ्यासोबत दगाफटका...; शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताच संजय निरुपम यांनी सांगितला तो किस्सा

Special Report : Ajit Pawar यांना पुतण्या Yugendra Pawar देणार आव्हान?

Today's Marathi News Live : अमोल किर्तीकर यांच्या पत्नीचाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अर्ज दाखल

Special Report : Sharad Pawar यांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत फोडला घाम!

Special Report | काळ आला होता पण...हेलिकॉप्टर दुर्घटनेत अंधारे बचावल्या Jayant Patil सुद्धा सुखरूप

SCROLL FOR NEXT